जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांचा व्हीडिओ आणि ऑडिओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला असून त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी घेतली आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे चुकीचे संदेश जात आहेत.त्यामुळे या व्हीडिओ आणि ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
हे व्हीडिओ आणि ऑडिओ क्लिप तयार केलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.तसेच शहर आणि जिल्ह्यातील अनेक गावांत रस्ते अडविण्याचे प्रकार सुरू आहेत.रस्ते अडवणे हा गुन्हा असून रस्ते अडवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे,तसेच रेशन धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ते अडकल्यामुळे त्रास होत आहे.तरी रस्ते कोणीही अडथळे टाकून अडवू नयेत.अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.