Tuesday, December 24, 2024

/

जिल्ह्यात एकूण 850 जणांचे झाले निरीक्षण 

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात रविवार दि. 5 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 850 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 79 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून त्यापैकी 7 नमुन्यांचा रिपोर्ट पाॅझेटिव्ह आला असून 69 नमुने निगेटिव्ह असल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटच्या प्रसिद्धी पत्रकानुसार रविवारी दि. 5 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 850 संशयित व्यक्तींची वैद्यकीय निरीक्षण अर्थात तपासणी करण्यात आली आहे. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 229 असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 38 आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 416 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 167 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 79 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 7 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून उर्वरित 69 नमुने निगेटिव्ह आहेत.

Mask
Mask

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून वाढत असून दोन दिवसापूर्वी बेळगुंदी हिरेबागेवाडी व कॅम्प येथील तिघाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काल रविवारी रायबाग तालुक्यातील कुडची परिसरातील 3 महिलांसह एकूण 4 जणांना कोरोना बाधित असल्याचे स्वाब तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील लॉज व हॉटेल्स होम टाईम काॅरन्टाईनसाठी ताब्यात घेतले आहेत. याठिकाणी होम काॅरन्टाईन केलेल्या लोकांना ठेवण्यात येणार आहे. संबंधित लाॅज व हॉटेल्समधील निवडक खोल्यांची रविवारी मनपा कर्मचाऱ्यांकडून सफाई करून घेण्यात आल.

भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये.

त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.