Friday, December 27, 2024

/

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर : 50 अहवाल प्रलंबित

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या रविवारी स्थिर होती बेळगाव जिल्ह्यात रविवार दि. 19 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 2,071 इतक्या लोकांचे वैद्यकीय निरीक्षण झाले. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 780 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते, त्यापैकी 42 (1) जणांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 50 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 19 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 2,071 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 327 झाली असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 47 आहे.

आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 708 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 989 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 780 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 42 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 688 नमुने निगेटिव्ह असून 50 नमुन्यांचा अहवाल हाती येणे बाकी आहे. आतापर्यंत 1 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरा झाला आहे.

दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.