कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात राज्यात आणखी 29 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 474 इतकी झाली आहे. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला असून 152 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात काल गुरुवार दि 23 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि 24 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 29 रुग्ण आढळून आले असून यापैकी सर्वाधिक 19 रुग्ण राजधानी बेंगलोर शहरातील आहेत. गेल्या 24 तासात आढळून आलेल्या नव्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 474 झाली आहे.
नव्याने आढळून आलेल्या 29 रूग्णांमध्ये बेंगलोर शहरातील 19 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उर्वरीत कोरोना बाधित रुग्ण बेळगाव (2), बागलकोट (3), विजयपुरा (2), तुमकुर (1), चिकबेळ्ळापूर (1), आणि मंड्या (1) या जिल्ह्यांमधील आहेत.