बेळगावात कोरोना भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही प्रयोगशाळेकडे 107 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे आणखी किती जण पॉझिटिव्ह सापडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगावात गुरुवारी 17 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यानंतर एकच खळबळ माजली होती. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील येळ्ळूर सारख्या गावात एक 45 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पुन्हा बेळगावात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी बुलेटिन मध्ये 5 जण शहरातील नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
बेळगावात अद्यापही 107 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. तर एकूण 678 नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यामधील 528 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 41 पॉझिटिव्ह सापडले आहेत. 1969 जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. त्यामधील 374 जण 14 दिवसांसाठी निरीक्षणाखाली तर 40 रुग्ण आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहेत.
बेळगाव आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटीन मध्ये 17 एप्रिल पर्यांचा अहवालात एकूण 41 जण पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ माजली आहे. अजूनही 107 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामध्ये किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.