संसार म्हटला की वेगवेगळे ताणतणाव आले, टेन्शन आलं, घर चालवणाऱ्या पुरुषाला घरातनं सर्वच बायका साथ देतात. मात्र त्याच्यासाठी एखाद्या व्यवसायात उतरून संसारात चांगली साथ देण्याचे काम ज्या महिला करतात त्याच संसार जोडून जातात. ताणतणाव कमी करतात. अशाच एका चव्हाट गल्ली येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांची कहाणी आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून कोतवाल गल्लीत त्या भाजीविक्रीचे काम करतात आणि आता आहे त्यांचे वय 62 वर्षे ….
पती, तीन मुली आणि एक मुलगा असे त्यांचे कुटुंब . त्यांचा विवाह झाला आणि पती उद्यमबाग येथे जेमतेम पगाराची नोकरी करत होते. मुलं झाली. मुलं मोठी होऊ लागली तेव्हा त्यांची शिक्षणे आणि लग्न कसे करून द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला होता.
नवऱ्याच्या जेमतेम पगाराची नोकरीत काही चालत नव्हतं, अखेर लक्ष्मीबाईंनी ठरवलं की आपण काहीतरी करायचं आणि त्यांनी भाजी विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी भाजी मार्केट मधून भाजी घ्यायची आणि कोतवाल गल्लीच्या कोपऱ्यावर बसून विकायची असा व्यवसाय करत, त्यांनी आपल्या मुलींची लग्न करून दिली, शिक्षण केली आणि आज एक सुखी जीवन जगत आहेत.
भाजी मार्केट हलवले गेल्यानंतर लांब जाऊन भाजी आणता येत नाही म्हणून त्यांचा व्यवसाय काही थंडावला आहे .
आजपर्यंत जे काही केलं आणि त्यामुळे संसाराला हातभार लागला त्याचं समाधान त्यांच्या बोलण्यातून दिसतं .लक्ष्मी माणिक राठोळे या खरोखरच आजच्या महिलांच्या दृष्टीने आदर्श ठरतात.
नवऱ्यानं सगळं करावं नवऱ्याने पैसे आणावेत .आपल्याला पिक्चरला घेऊन जावं, न चैनी करायला द्यावं असं सगळं म्हणणाऱ्या काही बायकांच्या जगात लक्ष्मीबाईंनी निर्माण केलेला आदर्श महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी आदर्श असाच आहे.
#womensday2020#belgaumlive womansdaycoverage2020#vegetabalesaler#