टेलरिंग(शिवणकाम) या व्यवसायात अनेक महिला अग्रेसर आहेत उपजीविकेचे सोपे साधन म्हणून हा व्यवसाय समाजात प्रचलित आहे अनेक बेरोजगार असहाय्य अशिक्षित सुशिक्षित महिला आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी या व्यवसायाचा अवलंब करत असतात.
बेळगाव तालुक्यातील निलजी गावची अशीच एक कष्टाळू महिला आहेत मेघाताई पाटील त्यांनी टेलरिंग व्यवसायात यश संपादन करत पती सोबत संसाराला यशस्वीपणे हातभार लावला आहे.
मेघा ताई यांचे वय आज 38 वर्षे लग्न झालेल्या 18व्या वर्षीपासून त्या टेलरिंग व्यवसायात कार्यरत आहेत लग्न झालेल्या दुसऱ्या दिवसा पासून या व्यवसायात पतीसोबत शिवणकाम करताहेत.त्यांचे मूळ गाव देसुर असून सासर हे निलजी आहे त्यांचे शिक्षण दहावी पर्यंत झालं आहे.निलजी सारख्या खेड्यातून येऊन काकतीवेस भागांत अक्षता टेलरिंग हे दुकान यशस्वीरीत्या सांभाळत आहेत त्यांचे मधू पाटील हे देखील त्याच व्यवसायात आहेत मात्र यात मेघाताई यांचा सिंहाचा वाटा आहे.
महिलांचे सर्वप्रकारच्या फॅशनचे ड्रेस उत्तम रित्या शिवणकाम करून देतात काकतीवेस भागांत महिला ड्रेस शिवनकामात नावारूपाला आल्या आहेतमुलं लहान असतेवेळी बस स्टँड पासून खडक गल्ली पर्यन्तच पूर्वीच्या दुकानात चालत येत काबाड कष्ट घेऊन आम्ही हा व्यवसाय यशस्वी केलाय असे त्या ठामपणे सांगतात.व्यवसाय करत करत मुलांचे संगोपन शिक्षण देखील त्यांनी व्यवस्थित केली आहेत.
आपल्या पतीच्या व्यवसायात आपण कशी मदत करावी हा समाजा समोर एक उत्कृष्ट आदर्श ठेवला आहे.अश्या या कष्टाळू महिलेचा आदर्श इतरांनी घ्यायला हरकत नाही.