बेळगाव शहरात काटेकोरपणे लॉक डाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.शहरातील सगळ्या भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणीही घराबाहेर पडू नये.निष्कारण वाहन घेऊन शहरात फिरणाऱ्या व्यक्तीचे वाहन जप्त करून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आम्हाला नागरिकांनी सहकार्य करावे.प्रत्येकाला आवश्यक वस्तू घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्येकाच्या घरासमोर भाजीपाला,किराणा साहित्य मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.
घराबाहेर पडल्यास पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळेल असे पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी एपीएमसी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
Sir we are leaving in Samarth Nagar Belagavi and we people are far away from these type of fasalities. So please provide all the facalaties to our Samarth Nagar area also
Absolutely correct & more over this is all for our sefty only.