आपटेकर गल्ली महाद्वार रोड येथील युवा कार्यकर्ते प्रवीण रेडेकर आणि संतोष गोडसे या दोघांनी दिवस-रात्र रस्त्यावर थांबून लोकांना जीवघेण्या कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना शनिवारी हॅन्डवॉशचे वाटप केले.
आज बेळगावमधील जे पोलिस सामान्य नागरीकसाठी दिवसरात्र रस्त्यावर थांबून लोकांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित करण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. वास्तविक सध्याच्या परिस्थितीत स्वतःलाही कोरोनाचा धोका आहे याची जाणीव असूनही पोलीस आपले काम चौक बजावत आहेत.
जनतेची काळजी घेणाऱ्या या पोलिसांसाठी आता आपटेकर गल्ली महाद्वार रोड येथील प्रवीण रेडेकर आणि संतोष गोडशे युवक पुढे सरसावले आहेत. आज या उभयतांनी शहरातील चौकाचौकात व रस्त्यावर आपले कर्तव्य पार पडणाऱ्या पोलिसांना दुचाकीवरून हॅन्डवॉश पाकिटांचे वितरण केले.
सध्याच्या लाॅक डाऊनच्या कालावधी आज शनिवारी हॅन्ड वॉशची पाकिटे वितरण करणाऱ्या प्रवीण आणि संतोष या उभयतांनी पुढील कालावधीत ड्युटीवरील पोलिसांना पिण्याचे पाणी, बिस्किटे, पुलाव आदींचे वितरण करण्याचे ठरविले आहे.