Monday, December 2, 2024

/

खून प्रकरणातील ते फरारी आरोपी अटकेत

 belgaum

होनिहाळ येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने लष्करी जवान असलेल्या पतीच्या केलेल्या खून प्रकरणी फरारी असलेल्या दोघा आरोपींना मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे.नवीन कंगेरी व प्रशांत हुडेद हे दोघा जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी मृत्यू जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला या अगोदर अटक केली होती तर खुनात सहभागी असलेले आरोपी प्रशांत याचे मित्र दोघे जण फरारी होते त्यांना आज अटक झाली आहे.

Marihal ps
Marihal ps

दीपक चंद्रकांत पट्टणदार याचा जवानाचा खून झाला होता दीपक याची पत्नी अंजली दीपक पट्टणदार (वय 26, रा. होनिहाळ) आणि तिचा प्रियकर प्रशांत दत्तात्रय पाटील (वय 28, रा. होनिहाळ) यांनी कट रचून हा खून केला होता.

दीपक चंद्रकांत पट्टणदार (वय 32) हा दिल्ली येथे लष्करात सेवा बजावत होता. महिनाभरापूर्वी सुट्टीवर गावी आलेला हा लष्करी जवान गेल्या 28 जानेवारी पासून बेपत्ता होता. मात्र दिपकचा त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने निघृण खून केल्याची आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतः पोलिसात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

पोलीस निरीक्षक विजय शिंनूर आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी पोलीस मारिहाळ स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.