रस्ता ओलांडताना मालवाहू टिप्परने धडक दिल्याने सात वर्षीय बालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.बेळगाव शहरातील बॉक्साइट रोडवर सोमवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जकींखान शेरखान पठाण वय 7 रा. जनता कॉलनी वैभवनगर बेळगावं असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.शाळेतून परत असतेवेळी हा अपघात घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.बॉक्साइट रोडवर डबल रोड ओलांडताना के ए 22 बी 6733 हा टिप्पर बालकाला धडकला त्यात बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाता नंतर टिप्पर चालकाने पलायन केले होते.
घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली होती पोलिसांनी धाव घेत रहदारीचे अडथळे दूर केले.रहदारी उत्तर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे