कोरोना विषाणूने जगभरात निर्माण केलेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज गुरुवारी एक संशयित रुग्ण दाखल झाला असून कोरोना संबंधित त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या घटनेमुळे चर्चा आणि तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज गुरुवारी कोरोनाशी संबंधित एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आवारातील एका स्वतंत्र इमारतीमध्ये विषेश वाॅर्ड सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी संबंधित संशयित रुग्णाला दाखल करण्यात आले असून कोरोना संदर्भातील त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत.
केरळ हुन बेळगावला दाखल झालेल्या एका 60 वर्षीय वृद्धाला कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रक्ताचे नमुने पुणे येथील लॅब पाठवण्यात आले आहेत.याचा रिपोर्ट आल्यावर याबाबत माहिती कळणार आहे
दरम्यान, दुबई दौऱ्यावर जाऊन मुंबईत परतलेल्या 40 जणांच्या एका ग्रुपमधील कांही लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ग्रुपमध्ये बेळगावच्या तिघाजणांचा समावेश असल्याचे वृत्तही समोर आले आहे. बेळगावात एकही कोरोना संशयित नसल्याचे जिल्हा प्रशासन जाहीर करते न करते तोच आता एक संशयित रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून चर्चा व तर्कवितर्कांना ऊत आला आहे.