धोकादायक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत देशव्यापी “जनता कर्फ्य” घोषित केला आहे. याला बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनने पाठिंबा दर्शवून आपले सर्व व्यवहार रविवारी बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.
बेळगाव हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या कीर्ती हॉटेलमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल हेगडे होते. बैठकीतील निर्णयानुसार आता रविवार 22 मार्च रोजी शहरातील सर्व हॉटेल्स संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेचे सचिव विजय सालियान यांनी कळविले आहे.
पेंडाल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे आवाहन
देशातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवार दि. 22 मार्च रोजी देशव्यापी “जनता कर्फ्य” घोषित केला आहे. तथापि या दिवसाची वाट न पाहता नागरिकांनी आत्तापासूनच विनाकारण घराबाहेर टाळावे, असे आवाहन बेळगाव तालुका पेंडल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनने केले आहे.
भारतासह जगभरातील कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन या विषाणू विरुद्ध भारतातील एकजूट जगाला दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी देशव्यापी जनता कर्फ्यू अर्थात स्वयं संचारबंदी घोषित केली आहे. या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेशी जोडल्या गेलेल्या लोकांना व्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. पंतप्रधानांचे हे आवाहन स्तुत्य असले तरी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता नागरिकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य रोग असल्याने नागरिकांनी रविवारची वाट न पाहता स्वतःहून आत्तापासूनच आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनने केले आहे.