स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात प्रशासनाणे कमी खर्चात नागरिकांची जास्तीत जास्त कामे करणारे आणि मित्रत्वाचे नाते जपणारे असले पाहिजे. मात्र बेळगाव शहरात आता उलट कामे सुरू झाल्यामुळे कामे कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने कार्यपद्धती कामे करणार अशी आशा होती. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची खोदाई करून ही कामे अर्धवट टाकण्यात धन्यता मांडण्यात आली आहे. याचबरोबर इतर सर्व कामे अर्धवट असून त्यासाठी प्रशासन प्रयत्नही करत नसल्याचे दिसून येत आहे. कामाचे पूर्णपणे मोजमाप मिळू शकेल आणि पारदर्शक व्यवहार असतील याची दखल या योजनेअंतर्गत जपली जाणार होती. प्रशासकीय कामकाजात खर्च कमी करण्यासाठी मोबाईलवर सर्व प्रकारच्या सोयी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र तसे होताना दिसत नाही.
नागरिकांना प्रत्येक कामासाठी प्रशासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे ठरणार होते. मात्र नागरिकांना हेळसांड करण्यासाठी ही कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्रुप स्थापन करण्याची गरज आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष करून नागरिकांच्या डोकेदुखीत भर घालण्याचे काम प्रशासनाने केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात कामांना चालना देण्यात आली. मात्र ती अप्रत्यक्षरीत्या योग्य करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे. स्मार्ट सिटीचे धोरण आणि सुविधा त्यातील उद्दिष्टे त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आले आहेत. एवढे असले तरी मनमानी कारभार सुरूच असून यापुढे तरी स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांना सोयी सुविधा देण्याकडे आणि तसेच कमी खर्चात मित्रत्वाचे नाते जगण्याकडे प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.