कोरोना विषाणु विरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान मदत निधीला भोजगल्ली शहापूर येथील चांदीचे सुप्रसिद्ध व्यापारी किरण प्रकाश शिरोडकर यांनी 1 लाख 1 हजार 101 रुपयांची भरघोस मदत देऊ केली आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी देशातील नागरिकांना पंतप्रधान मदत निधीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना भोज गल्ली शहापूर येथील चांदीचे प्रसिद्ध व्यापारी किरण प्रकाश शिरोडकर यांनी 1 लाख 1 हजार 101 रुपयांची उस्फुर्त मदत देऊ केली आहे.
किरण शिरोडकर यांना सामाजिक कार्याची आवड असून विविध सामाजिक उपक्रमांना ते नेहमी सहाय्य करत असतात विशेष करून रोटरी क्लब बेळगावच्या विविध उपक्रमांना त्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. आता देशभरातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मदत निधीला भरघोस मदत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.