सावंतवाडी मधील कंपनीच्या ट्रेंनिग साठी हुबळीला जाऊन परतते वेळी बेळगावात अडकलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनीना बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी पर्यंत सुखरूप पोचवले.
गेल्या चार दिवसांपूर्वी सात विद्यार्थी हुबळी ते बेळगांव तसेच बेळगांव ते सावंतवाडी असा प्रवास करत सावंतवाडीला पोहोचले.हुबळीला ट्रेनिंग संपवून त्या बेळगावात अडकल्या होत्या मात्र परिवाहन सेवा बंद असल्याने त्यांना कोकणात जायला अडचणी निर्माण येत होत्या.
बेळगावातून राहुल केसरकर याच्या मालकीच्या मारुती कार मधून बजरंग दलाच्या मदतीने त्यांना सोडण्यात आले यावेळी योगेश गौडाडकर ,सागर राऊत उपस्थित होते.यावेळी विजय जाधव कृष्णकांत गौडाडकर यांच्या मार्गदर्शन लाभले. यावेळी त्या सर्व विद्यार्थ्यांनी बजरंग दल बेळगावच्या त्या सर्वांचे आभार मानले.