एपीएमसीमध्ये अनेक रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान होत असले तरी ही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. याचा फटका येथील व्यापारांना बसू लागला आहे. त्यामुळे येथील रस्ते तातडीने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
एपीएमसीतील प्रवेशद्वारासमोर जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एका कडेने वाहतूक सुरू असून हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. एका बाजूने वाहतूक सुरु झाल्याने कोंडी निर्माण होत आहे. याबाबत एपीएमसी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन रस्ते तातडीने पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
17 कोटी निधीतून या कामांना चालना देण्यात आली आहे. अजूनही बरेच रस्ते करणे बाकी आहे. त्यामुळे जे रस्ते खोदाई करून ठेवण्यात आले आहेत त्या रस्त्याला तातडीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना ताकीद देणे गरजेचे आहे. एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने वर्दळही अधिक असते. हे रस्ते कधी पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
एपीएमसी प्रवेशद्वाराचा रस्ता खोदाई करून ठेवण्यात आल्याने मोठी समस्या होत आहे. त्याचबरोबर इतर परिसरातील ही रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. परिणामी काही रस्ते झाले असले तरी त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने व्यापारातून संताप व्यक्त होत आहे. एपीएमसी मधील रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आल्याने समाधान तर होता. मात्र हे रस्ते तातडीने पूर्ण करुन सोय करावी अशी मागणी होत आहे.