सौंदत्ती येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुनीता निंबरगी यांना मुख्यमंत्र्याचे पदक जाहीर झाले आहे.शौर्य आणि अतिक्रमण हटवण्यासाठी घेतलेली कणखर भूमिका यासाठी त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्रायचे पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या वन खात्यातील महिला अधिकारी आहेत.वन संरक्षण आणि संवर्धन यामध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे.आपले वरिष्ठ आणि सहकारी यांच्या सहकार्यामुळे हे पदक मिळाले आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अनेक जनजागृतीपर कार्यक्रम देखील त्यांनी राबवले आहेत.जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी आहेत.
वृक्ष लागवडीच्या संदर्भात देखील त्यांनी बहुमोल कार्य केले आहे.वन्य प्राण्यांविषयी देखील जंगल परिसरात राहणाऱ्या जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.आपल्या मुलींचाही नोकरी करताना पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.