के एल ई संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ .प्रभाकर कोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सलग आठव्या वेळी कोरे यांची संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नूतन संचालक मंडळाची बैठक के एल ई संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली.यावेळी उपस्थित सदस्यांनी कोरे यांची एकमताने कर एल ई संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड केली.
संस्थेची सूत्रे स्वीकारल्यापासून कोरे यांनी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून संस्थेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली आहे असे उदगार कोरे यांचे अभिनंदन करताना विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी काढले.
38 शाळा ,कॉलेज वरून 270 शाळा ,कॉलेज सुरू करण्याचे श्रेय कोरे यांना जाते असे उदगार डॉक्टर एच.बी.राजशेखर यांनी काढले.बैठकीला के एल ई चे संचालक मंडळ,आजीव सभासद आदी उपस्थित होते.