घरासमोर थांबविण्यात आलेल्या कारवर दगड फेकून काचा फोडून आग लागल्याची घटना घडली आहे.शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिंदवाडी चौथा क्रॉस येथे ही घटना घडली आहे.
कारच्या काचा फोडून पेट्रोल ओतून आग लावल्यामुळे कारमधील सीटचे आणि काही भागांचे नुकसान झाले आहे.स्वाती रेवणकर यांच्या मालकीची ही कार आहे.पहाटे पाचच्या सुमारास काहीतरी फुटल्याचा आवाज आला त्यामुळे स्वाती यांचे पती संजय यांना जाग आली आणि ते बाहेर आले.
बाहेर आल्यावर त्यांना कारच्या काचा फुटल्या असून कारला आग लावण्यात आल्याचे दिसले.संजय हे बाहेर येताच कारला आग लावणारा माणूस पळून गेला.कारला आग लावणारा एकटाच होता असे संजय यांनी सांगितले.
संजय हे बाहेर आल्यावर आग लावणारी व्यक्ती पळून गेली.नंतर संजय यांनी आग विझवली.कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.