खानापूर तालुक्यातील आमटे गावाजवळील जंगलात दिनांक 11 मार्च रोजी एका शेतकऱ्याचे शव मिळाले होते त्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते मात्र पोलिसांनी तपास करत तो खून झाल्याचे तपासात कबूल केलं आहे.
खानापूर जवळील आमटे येथील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या तानाजी टोपा नाईक(२९) याचा अस्वलाच्या हल्ल्यात बळी गेलेला नसून त्याला गोळ्या घालून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी तानाजीच्या पत्नीने खानापूर पोलिसात त्याला गोळ्या घालून ठार मारल्याची तक्रार नोंदवली होती.याचा तपास करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.तानाजी याला सिंगल बॅरल बंदुकीने गोळ्या घालून ठार करून त्याचा अंगावर जखमा करून अस्वलाने मारल्याचे भासविण्याचा कट संशयितांनी रचला होता.
खानापूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून हत्या प्रकरण उघडकीस आणले.पोस्ट मोर्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी तपास हाती घेतला होता.त्यावरूनच पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली.या हत्या प्रकरणी देविदास राजाराम गावकर(२८),संतोष सोमा गावकर(३२),विठ्ठल गणपती नायक(२१),रामा गणपती नाईक सगळे रा आमटे आणि प्रशांत गणपती सुतार (२८) आशा पाच जणांना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी व अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस स्थानकातील पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास लावला आहे.अस्वलाच्या हल्ल्यात मृत झाल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
11 मार्च रोजी प्रसिद्ध झालेली बातमी