जगाला भेडसावणाऱ्या प्राणघातक कोरोना व्हायरसची भीती बेळगावात आली आहे. बेळगाव सांबरा विमानतळावर आज मंगळवारी विदेशातून आलेल्या 9 जणांची कोरोना व्हायरसची बाधा झाल्याच्या संशयावरून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तथापि वैद्यकीय तपासणीत संबंधित 9 जणांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सध्या जगभरात कोरोना व्हायरस अर्थात विषाणूची दहशत निर्माण झाली असून नुकतेच देशातील दिल्ली आणि तेलंगाना या दोन ठिकाणी कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी सामरा विमानतळावर विदेशातून आगमन झालेल्या 9 जणांची कोरोना विषाणुची बाधा झाल्याच्या संशयावरून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विमानतळावरील बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या कक्षामध्ये बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ आणि त्यांच्या पथकाने स्क्रीन टेस्ट वगैरे वैद्यकीय तपासणी केली. कोरोना विषाणूसंदर्भातील या 9 संशयितांच्या रक्ताचे तसेच अन्य नमुन्यांची तातडीने युद्धपातळीवर मणिपाल येथील प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल मागविण्यात आला. सदर वैद्यकीय अहवालात संबंधित 9 जणांना प्राणघातक कोरोना विषाणुची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या डॉक्टर आणि सुटकेचा निश्वास सोडला.
विदेशातून आलेल्या संबंधित नऊ जणांमध्ये तीन विद्यार्थी आणि तीन जवानांचा समावेश आहे. हे सर्वजण श्रीलंका आणि चीनचा दौरा करून भारतात आले होते. आज सकाळी सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होताच आरोग्य खात्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर युद्धपातळीवर कोरोनाचे निदान करणाऱ्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र अखेर या सर्व चाचण्यांचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आल्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्यासह जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला, आणि त्यांनी संबंधित 9 जण कोरोना बाधित नसल्याचे जाहीर केले.
Yellur sulge जत्रा १३ एप्रिल महिन्यात होणार आहे