वाहनांचे थांबलेले प्रदूषण,कारखान्यांची थांबलेली धुरांडी , रस्त्यावरची कमी झालेली वर्दळ यामुळे एकदंर वातावरणातील वायूप्रदूषण कमी झाले आहे. स्वच्छ हवा व कमी झालेलं ध्वनी प्रदूषण या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे.
बेळगाव शहरातील नैसर्गिक मृत्यू बाबत पाहणी केली असता, लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत केवळ एकच व्यक्ती वृद्धपकाळाने मयत झाल्याची नोंद होती.काल हा आकडा दोन्ही वैकुंठ धामात मिळून केवळ चार होता. मूळ सांगायचा उद्देश्य म्हणजे वातावरणातील शुद्धतेमुळें नैसर्गिक मृत्युचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते माणूसच आपल्या ऱ्हासाला कारणीभूत आहे.
माणसाचं जगणं महत्वाचं, ते नैसर्गिक रित्या सुंदर जगता येतं चंगळवादी संस्कृतीमूळे अवास्तव भौतिक सुखाच्या मागे लागून माणसाने पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे.कोरोनाचे संकट आले ते आपल्या समाजाचे नुकसान करून निघून जाईल. पण या संकटांच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली आपलं गाव, परिसर आणि देश निरोगी ठेवायचा असेल तर माणसानं माणसा सारखं वागलं पाहिजे.निसर्गाचं शोषण करता कामा नये.
लॉक डाऊन आणि कोरोनामुळे नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण जरी घटले असले तरी मयताच्या अंत्य संस्काराला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. अनेक गावांत प्रवेश मार्गावर रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे देखील पै पाहुणे मयताला जाणे टाळत आहेत, अश्या परिस्थितीत अंत्य संस्कारासाठी कुणाला अडचण आली तर माजी महापौर विजय मोरे यांनी संपर्क करण्याचे आवाहन केलं आहे.
-विजय मोरे 09844268687