सजग लोकप्रतिनिधी अनिल बेनके यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यां सोबत त्यांचा उत्साह वाढवत बेळगाव निर्जंतु करण्याच्या मोहिमेत खांद्यांला खांदा लावून लढत आहेत.
लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे हे त्यांनी आपल्या कृतीतुन दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.पंतप्रधानानी आवाहन केल्याने जनतेने रस्त्यावर येण्याचे टाळले आहे त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य बनले आहे.बस स्थांनक रेल्वे रेल्वे स्टेशन खडे बाजार गणपत गल्ली ध.संभाजी चौक ही नेहमी गजबजनारी ठिकाणे सुनसान दिसत आहेत.
रविवारी सकाळी मनपा आयुक्त के व्ही जगदीश यांनी राणी चननम्मा चौकात औषध फवारणी केली शहरात बऱ्याच ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे उत्तरचे आमदार अनिल बेनके इतरां प्रमाणे प्रसिद्धी साठी स्टंट न करता शांतपणे आपलं काम करत आहेत.कोरोनाची प्रशासकीय पहिली बैठक मनपात बेनके यांनीच घेतली होती.आज त्यानी स्वतः मोहिमेत भाग चौकात स्वच्छता केली.
नागरिकांनी घरात राहण्याचे पसंत केल्याने मनपा कर्मचाऱ्यांना स्वच्छता औषध फवारणी करणे सोयीचे झाले आहे.नागरिकांनी सायंकाळी पर्यंत असेच सहकार्य करणे गरजेचे आहे.सामुदायिक लढूया कोरोना टाळूया…
व्हीडिओ पहाण्यासाठीन लिंक क्लिक करा-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1065597557131170&id=375504746140458
कोरोनाच्या लढाईत उत्तरआमदार अग्रभागी-
बेळगावातील कित्तुर राणी चन्नम्मा औषधांची फवारणी-आमदार अनिल बेनके स्वतः औषध फवारणी मोहिमेत घेतला सहभाग-मनपानकडून बस स्थानके चौक स्वच्छता मोहीम-पहा बेळगाव Live च्या खालील व्हीडिओत
#fightagainstcovid19
#coronaalertbelgaum
#nourthmlaanilbenke
#belgaumselfcarfew
#belgaumLivecaresforu