Sunday, December 1, 2024

/

….तर समाजाचे भवितव्य येईल धोक्यात

 belgaum

बळाचा वापर करणे आम्हालाही आवडत नाही कारण आम्हीही समाजाचा एक भाग आहोत, माणूस आहोत. तेंव्हा जर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली तर इतर पोलिसांचे मनोधैर्य खचून ते आपले काम करणे थांबवतील आणि जर का असे झाले तर समाजाचे भवितव्य धोक्यात येईल, असे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात एका पोलिस कर्मचाऱ्याने आरोग्य खात्याच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. नागरिकांकडून तसेच सोशल मीडियावर संबंधित पोलिसांवर कारवाई करून त्याला सस्पेंड केले जावे, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात बोलताना एसीबी एन.व्ही. बरमनी यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.

Bharmani cpi
Bharmani cpi

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युद्धपातळीवर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणु प्रादुर्भावाला पूर्णतः पायबंद घालून जनजीवन पूर्ववत सुरळीत करण्यासाठी शासनाची सर्व खाती अहोरात्र झटत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. कोरोनावर मात करायची असेल तर घराबाहेर पडू नका, असे नागरिकांना सातत्याने सांगितले जात आहे. तथापि लोक घराबाहेर पडत आहेत. हा प्रकार फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाज आणि देशासाठी घातक आहे, असे एसीपी बरमनी म्हणाले.

हा प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच आम्हाला म्हणजे पोलिसांना बऱ्याचदा नाईलाजाने बळाचा वापर करावा लागत आहे. तेंव्हा बळाचा वापर करणाऱ्या पोलिसाला सस्पेंड करण्यात आले तर इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य व मानसिक स्थिती खचेल आणि मानसिक स्थिती खचलेल्या या पोलिसांनी जर आपले काम करणे थांबविले तर समाजाचे भवितव्य धोक्यात येणार हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सध्या परिस्थिती अशी आहे की बळाचा वापर करावा की करू नये? अशा कोंडीत पोलिस सापडले आहेत, असेही एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी स्पष्ट केले.

नेमक भरमनी काय म्हणाले? पहा खालील व्हीडिओ – एपी एम सी गेट जवळून बंदोबस्तात असतेवेळी सेल्फी बाईट व्हायरल

घरातच रहा घरा बाहेर पडू नका-ए सी पी एन व्ही भरमनी यांची बेळगावातील जनतेला विनंती – एपी एम सी गेट जवळून बंदोबस्तात असतेवेळी सेल्फी बाईट व्हायरल

Posted by Belgaum Live on Tuesday, March 31, 2020

 belgaum

1 COMMENT

  1. True police should not be suspended even he was doing his duty,now onwards they should check the idcard and allow people to commute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.