एकंदर सर्वलोक मास्कचा वापर करत असल्यामुळे कोरोना जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्यतिरिक्त इतर रोगांची लागण होण्याच्या शक्यतेच प्रमाण घटलं आहे. माणसांचा सर्दी खोकला किंवा बारीक ताप येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
घरातच माणसे असल्याने रस्त्यावरचे उघडे पदार्थ खात नाहीत घरातील सकस ताजे अन्न खाल्ल्यामुळे घशात खवखव,पित्त अजीर्ण बदकोष्ठ कणकण अश्या व्याधी कमी झाल्याचे दिसून येत आहे.,शुद्ध हवा शुद्ध पाणी सकस आहार पुरेशी विश्रांती यामुळे माणसं समाधानी दिसत आहेत.
बेळगाव शहरात देखील परिसरात स्वच्छतेच प्रमाण वाढलं आहे मनपा आणि समाजसेवी संस्थांनी निर्जंतुकि केल्याने वातावरणातील विषाणूंची संख्या घटली आहे यासाठी सॅनिटायजर चा वापर सतत हात धुणे याचाच परिपाक म्हणून बारीक सारीक आजार गायब झाले आहेत.
![Home made food](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/03/FB_IMG_1585363657925.jpg)
किंबहुना एका बाजूला कोरोनाची धास्ती असली तरी दुसऱ्या बाजूला घरातल्या आहार विहारावर अवलंबून राहिले की फालतू चे रोग होत नाहीत हे नागरिकांच्या लक्षात आले आहे.गृहिणींच्या हातालाही अलौकिक चव आहे हे नवरोबांच्या लक्षात येऊ लागले आहे आणि कायम प्रकृतीच्या तक्रारी सांगणाऱ्या नवरोबांना गृहिणीही घरच्या अन्नाची महती समजावून सांगत आहेत.
घरात रहा,घरचे खा अन्न दात्रीचे कौतुक करा आणि दीर्घकाळ निरोगी जीवन जगण्याचा मंत्र जपा इति कोरोना आख्यान..