Wednesday, January 22, 2025

/

पिणाऱ्यांना लायसन्स लावलंच पाहिजे

 belgaum

पाश्चिमात्यांचं जीवनशैलीचा प्रभाव, उच्चभ्रू लोकांचे अंधानुकरण यामुळे मध्यम वर्गीय व मजूर वर्गात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. एकेकाळी गल्लीत एखादा माणूस दारू पिला तर त्याला ‘दारुडा’ म्हणून हिणवलं जायचं प्रसंगी त्याच्याशी बोलणंही टाळलं जायचं. दारुड्याच्या कुटुंबाला एका विशिष्ट नजरेने बघितलं जायचं. आता परिस्थिती उलटी झाली आहे, गल्लीत एखादा माणूस दारू पीत नसला तर त्याला आपल्यात बसवून घ्यायच्या लायकीचा नाही असं समजलं जातं! एकमेकांला डोळ्याच्या खूणा करून त्याला कटवायला सांगितलं जातं. त्याला जेवायला बोलावलं जात नाही, त्याला सहलीला सोबत घेतलं जातं नाही, जेवणावळीत तर त्याचं ताट वेगळंच पडतं. पिणाऱ्यांच्या दृष्टीनं तो अस्पृश्य असतो. या बदलामुळे समाजाची एकंदर परिस्थितीच बिकट झाली आहे.
• सामान्य कुटुंबातील माणूस आपली प्राथमिक गरज पहिल्यांदा भागवायची सोडून कॉटरची सोय अग्र क्रमाने करतो. पोरांची फी भरायची राहिली असेल तरी त्याला चालते, घरात तांदूळ नसले तरी चालते, स्वतःची धर्म पत्नी लोकांची भांडी घासून घर चालवत असेल तरी चालते. आपली झिंग महत्वाची, आपली धुंदी महत्वाची घशाला दारूचा सोस पडला तर, बायकोच्या कमरेत चार लाथा घालून तिनं कमवलेले पैसे या बयेवर उधळायला तयार असतात. घरातलं किडूक मुडुक सोनं नाणं गहाणवट व विकून आपल्या नशेसाठी पैश्याची जुळणी केली जाते.

घरात बायका पोरं वाट बघत असतात आणि हे झिंगुन नशेत गटारात पडलेले असतात. बापा वरचा निबंध लिहिणाऱ्या पोरांनी या आदर्श बापाचं काय कौतुक लिहावं हा प्रश्न चिन्ह आहे. ज्यांना आदर्श मानायचं तेच झिंगलेले तर पुढचा समाज लडखडणाराच. चार दिवस लॉक डाऊन झालं तर अवस्थेततेने तळमळणारे तळीराम दारू मिळावी म्हणून बेळगावल्या शहापूर भागात आंदोलन करायला रस्त्यावर उतरले होते. या तळीरामाना चाप बसयावचा असेल आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंब राखायची असतील तर आता कुटुंबीयांच्या ताब्यात हे नशेबाज आहेत 21 दिवसात नशा बंदीचा कोर्स पूर्ण करावा आणि आपली संसाराची खडतर वाट मखमली वाटेत बदलावी त्याच बरोबरअबकारी खात्या कडून दारू पिण्यासाठीचे लायसन्स जारी करण्याची गरज आहे आणि दारू पिण्याच्या लायसन्सचा अर्ज करताना पत्नी आणि मुले यांची एन ओ सी जोडायला लावावी.

माननीय मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी 21 दिवसाच्या लॉक डाऊन नंतर ही कारवाई करावी आणि अनेक महिलांची मंगळसूत्रे वाचवावीत, कोवळ्या मुलांच्या भाव विश्वातले अश्रू पुसावेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.