अनोळखी किंवा अपरिचित व्यक्ती दिसल्यास भीती वाटावी असेच सध्याचे दिवस आहेत. बेळगावमध्ये एका प्रार्थना स्थळांमध्ये मुंबईहून येऊन कांही लोक राहिले आहेत अशी कुणकूण नागरिकांना लागली आणि त्यांनी स्वतःच त्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक कार्यकर्ते युवानेते किरण जाधव यांनी यशस्वी मध्यस्ती करून संबंधित लोकांचे कोरोना स्क्रीनिंग केरविल्याची घटना शनिवारी घडली.
शहरातील एका प्रार्थना स्थळांमध्ये मुंबईहून येऊन कांही लोक राहिले आहेत, अशी कुणकूण नागरिकांना लागली आणि त्यांनी स्वतःच त्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री केला. परिणामी संबंधित भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजीक कार्यकर्ते युवानेते किरण जाधव यांना शनिवारी सकाळी हे वृत्त समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित सर्वांची भेट घेतली. तसेच त्या विशिष्ट समाजाच्या प्रमुखांना आणि अधिकाऱ्यांना विनंती करून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळामधील “त्या” सर्व लोकांचे स्क्रिनींग करून घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.
किरण जाधव यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तणावग्रस्त परिस्थिती आणि भीती अशा वातावरणात कोणताही प्रश्न संयमाने हाताळणे आवश्यक आहे. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून कोणालाही लक्ष करणे बरोबर नाही. या पार्श्वभूमीवर किरण जाधव यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरल्याने शनिवारी संबंधित भागात हा चर्चेचा विषय झाला होता.यावेळी त्या भागातील मुख्य समाज नेते उपस्थित होते त्यांनी देखील सामंजस्य पणा दाखवला होता.