जयपूर आणि जोधपूर अश्या बेळगाव हुन थेट दोन्ही विमानसेवा सुरू करू असे संजय घोडावत यांनी म्हटलं आहे .
स्टार एअर कंपनी प्रथमच राजस्थानसाठी आपली विमानसेवा सुरू करत असून येत्या 16 मार्चपासून प्राथमिक स्वरूपात बेळगावहून इंदोरमार्गे अजमेर (राजस्थान) अशी स्टार एअर विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय डी. घोडावत यांनी दिली आहे.
मला सांगताना अत्यानंद होत आहे कि, “लँड ऑफ कलर्स” म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या राजस्थानसाठी स्टार एअरने पहिल्यांदाच आपली द्वारे खुली केली आहेत. आता आम्ही प्राथमिक स्वरूपात येत्या 16 मार्चपासून बेळगावहुन इंदोर मार्गे अजमेर (राजस्थान) अशी आमची विमानसेवा सुरू करत आहोत. प्राथमिक स्वरूपात ही विमानसेवा अजमेरला इंदोरमार्गे जोडेल. त्यानंतर सुरत आणि अहमदाबाद हेदेखील अजमेरला जोडले जाणार आहेत. त्यामुळे अजमेरला जाण्यासाठी तीन मार्ग स्टार एअरद्वारे उपलब्ध केले जात आहेत, असे संजय घोडावत यांनी सांगितले.
याखेरीज राजस्थानला आपले व्यवसायिक केंद्र बनवण्याच्या वचनपूर्तीसाठी स्टार एअर लवकरच बेळगावहून राजस्थानमधील जयपुर आणि जोधपुर याठिकाणी देखील आपली विमानसेवा सुरू करणार असल्याचे घोडावत यांनी स्पष्ट केले आहे.