मागील वर्षभरापासून बेळगावात विश्रांती घेतलेल्या ईराणी टोळीने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या टोळीची धास्ती आता शहराला लागून राहिली असून रविवारी दोन वृद्धांना गाठून लुटण्याचा प्रकार या टोळीतील म्होरक्यांनी केला आहे. त्यामुळे यापुढे वृद्धांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
ही टोळी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवत असते. रविवारी क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांना लुटण्यात आले आहे. या टोळीतील मोरके वेगवेगळ्या राज्यात सक्रिय असून मागील वर्षभरापासून त्यांनी बेळगावकडे फिरकले नव्हते. मात्र आता पुन्हा या टोळीतील काही म्होरके बेळगावात दाखल झाले असून त्यांच्या उचापतीला सुरुवात केली आहे.
माळमारुती व कॅम्प पोलिस स्थानकाच्या हद्दीत या इराणी टोळीतील भामट्यांनी दोघा वृद्धांना लुटले आहे. श्रीनगर येथील अंकिता गोल्ड शॉप समोर मोटरसायकलवरून जाणाऱ्या श्रीरंग कृष्णाजी जोशी (वय ६२ राहणार रामनगर) व महावीर कॅन्टीन जवळ हुबळी येथील लक्ष्मण नागाप्पा बनवी (वय65) या उद्यानाला गाठून त्यांच्याकडून सुमारे तीन ते चार लाखांचे दागिने आपण क्राइम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लुटले आहेत. त्यामुळे वृद्धांनी आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वेळीही पोलीस निरीक्षक बी आर गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी इराणी टोळीतील गुन्हेगारांना पकडले होते. त्यानंतर बेळगावात काही काळ इराणी टोळीतील गुन्हेगारांचा वावर थांबला होता. आता पुन्हा ते सक्रिय झाले असून बेळगावात उचापती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वृद्धांनी आता दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली असून पोलिसांनी ही अशा भामट्यांना पकडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.