इंदोर आणि किशनगड(अजमेर) हवाईमार्गे थेट जोडले जावेत ही गेल्या अनेक वर्षापासूनची लाखो लोकांची मागणी आता स्टार एअर कंपनी पूर्ण करत आहे. स्टार एअरतर्फे इंदोर आणि किशनगड दरम्यान भारतातील पहिली थेट व्यावसायिक विमानसेवा येत्या सोमवार दि. 16 मार्च पासून सुरू केली जाणार आहे.
इंदोर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर दि. 16 रोजी दुपारी 1 वाजता या विमानसेवेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रारंभी तिकीट काउंटरचे उद्घाटन होणार असून त्यानंतर दुपारी 1 वाजता पूजाविधी आणि दिपप्रज्वलनाने विमानसेवेचे उद्घाटन केले जाणार आहे.याप्रसंगी खासदार शंकर लालवाणी, मध्यप्रदेश सरकारमधील नागरिक खात्याचे काम पाहणारे कॅबिनेट मंत्री पी. सी. शर्मा, विमानतळ संचालक श्रीमती अरिमा सान्याल आदींसह उद्योग आणि नोकरशाही क्षेत्रातील नामवंत व्यक्ती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा अधिकारीवर्ग उपस्थित राहणार आहे.
इंदोरप्रमाणे किशनगड (अजमेर)विमानतळ, येथे आयोजित समारंभास अजमेर दर्गा शरीफचे गद्दी नशीन हाजी सईद सलमान चिस्ती, अजमेर राजस्थानचे आमदार भागीरथ चौधरी, सुरेश टक, मार्बल असोसिएशन सेक्रेटरी सुधीर, आर. के. मार्बल्सचे मालक अशोक गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Below is the schedule for Belgaum – Indore – Kishangarh sector:
ORIGIN DESTINATION DEPARTURE ARRIVAL FREQUENCY
Belgaum Indore 13:10 14:40 MON, TUE, THU
Indore Belgaum 17:55 19:35 MON, TUE, THU
Indore Kishangarh 15:00 16:05 MON, TUE, THU
Kishangarh Indore 16:30 17:35 MON, TUE, THU