संपूर्ण देशात कोरोनाची धास्ती लागून राहिली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत असताना तळीरामांना मात्र आपल्या सोयीची फिकीर लागून राहिली आहे. येळ्ळूर परिसरातील तळीराम आता गावठी दारूकडे वळू लागल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
येळ्ळूर ,सुळगा,देसुर,वडगाव आणि कणबर्गी व आजूबाजूच्या गावातील तळीराम यरमाळ येथे गावठी दारू पिण्यासाठी गर्दी करत आहेत. लॉक डाऊन झाल्यामुळे तळीरामाना मद्यशिवाय दिवस काढावे लागत असल्यामुळे अनेक जनता गावठी दारू ठेवले आहेत त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
यरमाळ येथे काही जणांनी गावठी दारू तयार करायचा उद्योग लॉक डाऊनच्या काळात सुरू केला असून सध्या या गावठी दारूला मद्यपी कडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.180 मिली दारू बाटलीला दुकानात 50 रु पडतात तर येथे ही गावठी दारू 20 रू ला मिळते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची तल्लफ देखील भागते आणि पैसेही वाचत आहेत. यामुळे अनेकजण गावठी दारूकडे वळले असून या गावठी दारू विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त कारावा अशी मागणी होत आहे.
मद्यपी दारू पिण्यासाठी यरमाळ येथे मोठी गर्दी करत आहेत. दारू खरेदी केल्यावर तेथेच शेतात बसून दारू ढोसायची आणि धुंदीत घरी जायचे असा मद्यापीचा दिनक्रम सुरू आहे. यामुळे लॉक डाऊनच्या काळात गावठी दारू तयार करणारे आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मात्र काही शेतमध्ये अनेक प्लास्टिकचा तर पडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून पोलिसांनी संबंधितांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.