कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्तव्यदक्ष सदस्य साजिद शेख यांच्या प्रयत्नामुळे कॅम्प येथील इंडिपेंडन्स रोडवरील सांडपाणी वाहणारा दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
कॅम्प येथील इंडिपेंडन्स रोडवरील केंद्रीय विद्यालय नजीक असणाऱ्या ड्रेनेजच्या मेन हॉलचे झाकण फुटल्याने कांही दिवसापूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत होते. या सांडपाण्याचा केंद्रीय विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला तसेच या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना त्रास होत होत. त्याचप्रमाणे या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”ने आवाज उठविला होता.
बेळगाव लाईव्हने उठलेल्या या आवाजाची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी तात्काळ इंडिपेंडन्स रोडला भेट देऊन पाहणी केली होती. सदर पाहणी अंती त्यांनी अवजड वाहन गेल्यामुळे तुंबलेल्या ड्रेनेजचे झाकण फुटून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे या ड्रेनेजची त्वरीत दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार त्यांनी जातीने लक्ष घालून याद्वारे पाठपुरावा करून नुकतीच या ड्रेनेजची साफसफाई करून दुरुस्ती केली आहे. सदर ट्रेनिंग दुरुस्त झाल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक विशेष करून केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी आणि पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.