तालुक्यातील पूर्व भागातील एका कंत्राटदाराने नामी शक्कल लढवून मोठी माया गोळा केली आहे. त्यामुळे त्याने ब्लॅक अँड व्हाईटचा फार्मूला कशा पद्धतीने वापरला याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
त्यामुळे संबंधितावर आयकर खात्यातर्फे धाड टाकण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एका खाजगी संस्थेतून टोलेजंग इमारती बांधून याचबरोबर सध्या कणबर्गी परिसरात पेट्रोल पंप मार्फत ब्लॅक ऍण्ड व्हाईटचा फंडा त्याने सुरू केला आहे. भ्रष्टाचारातील रक्कम वेगवेगळ्या मार्गाने त्याने गुंतवली आहे. याचबरोबर अनेक जमिनी व घोटाळ्यात त्याने बक्कळ माया जमवल्याची चर्चा जोरदार सुरू असून याकडे आयकरने लक्ष देऊन धाड टाकावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
ग्राम विकास अधिकारी याच्याशी मिलीभगत करून अनेक गैरकारभार केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या आधीही ग्राम विकास अधिकारी याला संगणक उताऱ्याबाबत निलंबनाची कारवाई केली होती.
त्याच्या या कारभारामुळे अनेकजण संतापले असले तरी तक्रार देण्यास मात्र टाळाटाळ करत आहे. कारण साऱ्यांचेच लागेबांधे असल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपले गैरप्रकार सुरु ठेवल्याने अधिकारीही मूग गिळून गप्प बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कारवाई होणार की नाही अशी चर्चा सुरू आहे.
भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा टोलेजंग इमारती बांधण्यात गुंतल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. याचबरोबर काळा पैसा पांढरा करण्यासाठी आता पेट्रोल पंपाच्या माध्यमातून त्याने आपला कारभार सुरू ठेवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदरीत हा सारा गैरप्रकार करून देखील ग्रामविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने बरेच गैरप्रकार केल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे संबंधितावर धाड टाकण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.