कांही तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या मंगळवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी कॅम्प, नानावाडी, हिंदवाडी, टिळकवाडी, शहापूर, मारुती गल्ली आणि पाटील गल्ली परिसरातील वीज पुरवठा दि. 17 रोजी खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे हेस्कॉमने कळविले आहे.