“कर्नाटक बंद”च्या अनुषंगाने सरकारकडून सूचना पत्र जारी केलं आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने एक आठवड्यासाठी “कर्नाटक बंद” जाहीर केला असून त्याअनुषंगाने कांही निर्देश अर्थात सूचना जारी केल्या आहेत. सदर सूचना राज्यभरात रविवार दि. 15 मार्च 2020 पासून आठवडाभरासाठी लागू असणार आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहेत. 1) राज्यातील सर्व मॉल्स बंद राहतील 2) सर्व चित्रपटगृहे बंद राहतील, 3) लग्न समारंभ जर आधीच निश्चित झालेला असेल तर तो साध्या पद्धतीने (म्हणजे 1000 निमंत्रितांऐवजी 100 जण असावेत) पार पाडावा अन्यथा नवे लग्न समारंभ आयोजित करू नयेत, 4) नामकरण समारंभ साध्या पद्धतीने करावा, 5) वाढदिवस आणि मेजवान्या करू नयेत, 6) राज्यातील सर्व नाईट क्लब आणि बार बंद राहतील, 7) आयटी आणि आयटीबीटी उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगावे,
8) राज्यातील विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील, 9) एसएसएलसी आणि पीयुसी परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार होतील, 10) कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाऊ नयेत, 11) सर्व उद्याने बंद राहतील, 12) उन्हाळी शिबिरे भरू नयेत, 13) आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्व सरकारी कार्यालये मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील. वाहतुकीच्या सेवांपैकी बसगाड्या, मेट्रो रेल्वे आणि ऑटो रिक्षा सुरू राहतील.