दिल्ली येथे झालेला हिंसाचार आणि हिंसाचारात एक पोलीस कॉन्स्टेबल आणि गुप्तचर अधिकारीचा बळी घेणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी हमारा देश संघटना, बेळगावतर्फे करण्यात आली आहे. तसेच आज सोमवारी पंतप्रधानांच्या नावे तशा आशयाची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांना सादर करण्यात आले.
हमारा देश संघटना बेळगाव व्येंकटेश शिंदे
व मल्लिकार्जुन कोकणी यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना सादर करण्यात आले यावेळी हमारा देश पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांशी दिल्ली येथील हिंसाचाराला संदर्भात चर्चा करून सुरक्षा दलातील लोकांचा बळी घेणाऱ्या आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात नवी दिल्ली येथे उसळलेल्या हिंसाचारात सर्वसामान्य निष्पाप नागरिक जखमी होण्याबरोबरच काहींचे बळीही गेले. दंगल थोरांचा कहर म्हणजे त्यांनी आपल्या सुरक्षा पथकावर हल्ला केला. तसेच दिल्लीचा पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल याला गोळ्या घालून तर आयबी अधिकारी अंकित शर्मा यांना तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारण्यात आले. या कृत्याचा आम्ही धिक्कार करतो. हमारा देश संघटना कायद्याचा सन्मान करणारी संघटना असून या संघटनेला राज्यासह केंद्रातील सुरक्षा यंत्रणेच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. तेंव्हा दिल्ली हिंसाचारात रतनलाल आणि शर्मा यांचा बळी घेणाऱ्या तसेच मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरांना त्वरित गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी गणेश तोलानी, उमेश नायक, संदीप भिडे, सचिन इनामदार, प्रकाश रायचूर, अर्जुनसिंग राजपूत आदी हमारा देश संघटनेचे सदस्य उपस्थित होते.