हलगा मच्छे बायपास प्रकरणी धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी झाली.बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी मिळवलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी बाजू जोरदार मांडून स्थगिती उठविण्याचा प्रयत्न केला पण तो विफल ठरला.
जमिनीचे संपादन राष्ट्रीय महामार्ग क्र 4अ साठी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावायचा प्रश्नच उदभवत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.2009 साली प्राधिकरणाने 3 अ नोटिफिकेशन काढले आहे.
त्यानंतर एक वर्षाच्या आत 3 ड नोटिफिकेशन काढणे आवश्यक होते पण ते काढले गेले नाही.त्यामुळे नोटिफिकेशन आणि भु संपादन प्रक्रिया रद्द झाली आहे.
शेतकऱ्यांच्या वतीने रविकुमार गोकाककर यांनी बाजू मांडली.सुनावणीला हणमंत बाळेकुंद्री ,राजू मरवे आणि शेतकरी उपस्थित होते.