Wednesday, January 22, 2025

/

गटारी आणि नाल्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन

 belgaum

शिवाजीनगर येथील असद खाॅ सोसायटी परिसरातील गटारी आणि नाल्याची वेळोवेळी साफसफाई करण्याबरोबरच त्यांची रुंदी वाढवावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले आहे.

शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 49 चे माजी नगरसेवक साजिद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संबंधित भागातील नागरिकांतर्फे सदर मागणीचे निवेदन आज शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Bgm memo
Ex corpo memo

वीरभद्रनगरासह शिवाजीनगर येथील असद खाॅ सोसायटी परिसरातील अरूंद गटारींमुळे सांडपाणी तुंबून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण पसरत आहे. पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणांची गटारे आणि नाला तुडुंब भरून पावसाचे पाणी घराघरांमध्ये शिरत असते. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणची गटारे एक तर वेळोवेळी साफ केली जावीत अथवा ती प्रशस्त केली जावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी माजी नगरसेवक सादिक इनामदार यांच्यासह उमर फारूक शेख, जहूर अहमद शिरोडकर, ए. बी. मुल्ला, आश्पाक जमादार आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.