जगभरातील प्राणघातक कोरोना व्हायरस अर्थात कोरोना विषाणूच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दरवर्षी साजरे होणारे रंग बरसे महिलांची होळी असे अनेक सामुहिक होलिकोत्सव यंदा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान नागरिकांनी सार्वजनिक सामूहिक होळी साजरी करणे टाळावे, असे आवाहन पोलिस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार यांनी केले आहे.
भौगोलिक सीमांकनामुळे बेळगावची होळी खास समजले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी बेळगावात धुलीवंदन अर्थात रंगपंचमीने होळी साजरी केली जाते. तर पूर्वीच्या सांगली संस्थानात मोडणाऱ्या शहापूर, वडगाव आणि अनगोळ येथे पाचव्या दिवशी होळी साजरी होते.
गेल्या काही वर्षापासून कृत्रिम पाऊस आणि संगीत वाद्यवृंदाचा तालावर शहरात एकत्रितपणे सामुहिक होळी साजरी करण्याचे प्रस्थ वाढले आहे. मात्र आता जीवघेण्या कोरोना व्हायरस अर्थात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र जमू नये अशी सूचना जगभरातील तज्ञांनी केली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक होळी कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. बेळगावचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी यंदा सामूहिक पद्धतीने होळी (रंगपंचमी) साजरी करण्याचे टाळा, असे आवाहन केले आहे.
आता “कोरोना” दहशतीच्या पार्श्वभूमीवर यासर्वांनी यंदाचे आपापले सामूहिक होळी कार्यक्रम रद्द केले आहेत मात्र पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरा समोर पारंपरिक लोटांगण कार्यक्रम उत्साहात होणार आहे.या व्यतिरिक्त अनेक गल्लो गल्लीत होळीचा रंग पंचमीचा उत्साह पहायला मिळणार आहे.