डोळ्यात तिखटपूड टाकून ग्राम पंचायत सदस्याची हत्या केल्याची घटना कित्तूर जवळील बसरकोड गावात घडली आहे.देवगाव ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या बसरकोड गावचे ग्राम पंचायत सदस्य बसवराज दोडमनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बसवराज दोडमनी याचे गावातील एका महिले बरोबर अनैतिक संबंध होते.तिच्या बरोबर फोटो काढून घेऊन ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे त्या महिलेच्या पतीने मुलांना घेऊन गाव सोडून निघून गेला होता.
ग्राम पंचायत सदस्याच्या असभ्य वर्तणुकीला कंटाळून त्या महिलेने हत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.घटना कळल्यावर कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे.बसवराज दोडमनी हा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी होता.