तालुक्यातील पूर्व भागातील एका खासगी कंत्राटदारांन बकळ माया जमवली आहे. ग्रामपंचायत विकास अधिकारी आणि अध्यक्षांना हाताशी धरून त्याने अनेक भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्याची चर्चा असतानाच हा सर्व पैसा स्वतःच्या सोसायटी मधून पांढरा केल्याचे माहिती उपलब्ध झाले आहे. त्यामुळे संबंधितावर आयकर विभागाने धाड टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत अशा तिनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पकडून त्याने अनेक कारणामे केल्याचे उघडकीस आले आहे. अनधिकृत कामे करून ती कामे केल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्याची माहिती आहे. असे असताना देखील संबंधितावर कारवाई का होत नाही की वरिष्ठ अधिकारीही त्याच्या हाताखाली आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्याला पकडून त्याने मोठा गैरकारभार केल्याचे माहिती मिळाली आहे. यामुळे अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी आणि तालुका पंचायत मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याने हाताची धरल्याची माहिती मिळाली आहे. यामागेही सदस्यांना टूरला जाण्यासाठी त्यांनी पैसे दिल्याचे चर्चा जोरदार सुरू असताना आता नवीन उचापती करण्यात त्यांनी धन्यता मानली आहे.
ग्राम विकास अधिकारी अध्यक्ष आणि संबंधित कंत्राटदाराचे लागेबांधे असून परिसरातील कामे कोणालाच न देता संबंधित कंत्राटदाराला देण्यातच धन्यता मानण्यात येत आहे. काही ठिकाणी संबंधितांनी पेट्रोल पंप घातल्याचे ही उघडकीस येत आहे. मात्र त्याला अधिकृत परवानगी आहे का की अनधिकृत तेही काम सुरू असे अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.