संगोळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारासाठी एक आनंदाची बातमी आहे.न्यायालयाने आनंद अप्पूगोळ यांच्या जमिनीचा छडा लावून ती सरकारच्या नावे करण्याचा आदेश बजावला असून यासाठी बेळगावच्या प्रांताधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.तसेच तहसीलदार आणि मनपा आयुक्तांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
सरकारच्या नावे जमीन झाल्यावर त्याचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.नंतर लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना दिली जाणार आहे.त्यामुळे ठेवीदारांना व्याजासाहित पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लिलाव प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पार पडण्याची शक्यता आहे.
अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई सोसायटीत ठेवली होती.काही ठेवीदार मृत देखील झाले आहेत. अप्पूगोळच्या नावे आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे 190 मालमत्ता आहेत.या सगळ्या मालमत्ता
सरकार नावे करून पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.