कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांची अवघ्या जगाने धास्ती घेतली आहे. संपूर्ण जगाने त्याची धास्ती घेतली असताना भारतात ही त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. बेळगावात ही यासंबंधीचे तीन संशयित आढळले असून त्यांचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या साऱ्याच गोष्टीबाबत बेळगावात मात्र कोरोना गो अशीच भाषा वापरली जात असल्याचे दिसून येत आहे.
जगभरातील 114 देशात करूनच बाधा झाली आहे. वेगाने पसरत जाणारे या विषाणूमुळे बहुतेक देशाने पूर्वीपासूनच खबरदारी घेतली आहे. मात्र बेळगावात यासंबंधीचे सोशल मीडियावर होणारे जोक अनेकांचे हास्याचे किस्से ठरत आहेत. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने घेतले असून बेळगाव जिल्ह्यात तीन संशयित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
बेळगावात सध्या मास्क घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे धंदे जोरात सुरू असून कोरोनाची धास्ती कायम टिकून आहे. या धास्तीमुळे अनेक जण खबरदारी घेत आहेत. हे सारे प्रकार घडत असले तरी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण तर रामदास आठवले यांनी केलेल्या व्हिडीओ वर जोक्स पाठवत आहेत. मात्र या विषाणूंची धास्ती कायम आहे.
जिल्हा प्रशासनाने एकाबाजूला गांभीर्याने उपाययोजना सुरू केल्या असताना सोशल मीडियावर मात्र नेट करांच्या प्रतिभेला रंग चढत आहे. अनेक यासंबंधीचे विनोदी संदेश पाठविण्यात धन्यता मानण्यात येत आहे. मात्र या बाबतीत काळजी घेणे तितकेच महत्वाचे असून यापुढे तरी या विषाणू बाबत गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगावात सध्या तीन संशयित आढळले असले तरी अजूनही त्यांची चाचपणी सुरू आहे. अनेकांनी या रोगाबाबत काळजी घेणे गरजेचे असून भीती बाळगणे योग्य नाही असेही संदेश पाठविण्यात येत आहे.