Thursday, January 2, 2025

/

उद्दिष्ट शंभर कोटींचे ,गायत्री गोणबारे

 belgaum

सोसायटीत क्लार्क म्हणून नोकरीला लागून सेक्रेटरी पदापर्यंत गायत्री गोणबारे यांनी मजल मारली आहे.बेळगाव मजदूर को ऑप सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून कार्यभार त्या समर्थपणे सांभाळत आहेत.सतत कार्यरत राहणे,ग्राहकांशी सौजन्याने वागणे आणि ठरलेली कामे वेळच्या वेळी करणे हे त्यांच्या कार्याचे गमक आहे.

क्लार्क म्हणून रुजू झाल्यावर सोसायटीची सगळी कामे त्यांनी नीट समजून मनापासून कामे केली.रविवार सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सहकारी दीपिका जाधव आणि शामल मुतकेकर यांना घेऊन त्या कर्जवसुली करण्यासाठी बाहेर पडतात.1997 मध्ये त्या क्लार्क म्हणून सोसायटीत रुजू झाल्या आणि आपल्या कर्तबगारीवर आज त्या सेक्रेटरी पदाचा कार्यभार समर्थपणे सांभाळत आहेत.सोसायटीत तीन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी काम करतात.

Gayatri gonbare
Gayatri gonbare
सोसायटीचा एन पी ए शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.सोसायटीला अ दर्जा मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.सोसायटीची उलाढाल सध्या चाळीस कोटी असून ही उलाढाल शंभर कोटींवर नेण्याचे त्यांचे ध्येय आहे.ज्येष्ठ नेते कृष्णा मेणसे आणि संचालक मंडळाचे आपल्याला नेहमी मार्गदर्शन मिळते असे त्या सांगतात.सोसायटीत वातावरण नेहमी हसत खेळत राहावे यासाठी गायत्री प्रयत्नशील असतात.सोसायटीत संचालक आणि कर्मचारी असा भेदभाव केला जात नाही असे त्या आवर्जून सांगतात.
सोसायटीत सेक्रेटरी म्हणून सेवा बजावताना कुटुंबाकडे त्या दुर्लक्ष करत नाहीत.घरची सगळी कामे आटोपून वेळेवर सोसायटीत हजर असतात.त्यांना पूजा आणि पार्थ  अशी दोन मुले असून मुलगी पूजा एक उत्कृष्ट नर्तिका म्हणून ओळखली जाते. परदेशातील स्पर्धेत देखील तिने भाग घेतला होता.अनेक पुरस्कार पूजाला लाभले आहेत.
कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळून सोसायटीची उलाढाल शंभर कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या गायत्री गोणबारे यांची जिद्द आणि मेहनत कौतुकास्पद म्हणावी लागेल.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.