अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या तावडीतून निपाणी पोलिसांनी एकाची सुखरूप सुटका करून त्याला त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले.या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.कोगनोळी येथे शब्बीर बाबालाल मकानदार हे कौटूंबिक कार्यक्रमासाठी आले होते.
कार्यक्रम आटोपून ते इचलकरंजीला कारने परत जात असताना वाटेत त्यांची कार अडवून शब्बीर याना बाहेर काढून इनोव्हा गाडीतून अपहरणकर्त्यांनी नेले होते.या प्रकरणी त्यांच्या मुलाने निपाणी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती.
आज निपाणी पोलिसांनी कदमवाडी , कोल्हापूर येथून शब्बीर यांची सुखरूप सुटका करून पाच जणांना अटक केली.कदम वाडी येथील हिदायत बागवान याने शब्बीर यांचे अपहरण करण्याची सुपारी दिल्याची माहिती अटक केलेल्याकडून मिळाली आहे.आर्थिक व्यवहार हे अपहरण करण्या मागचे कारण आहे.अटक करण्यात आलेल्या पैकी चार जण कोल्हापूरचे तर एक जण शिरगाव गावचा आहे.