पोलिसांचा नकली युनिफॉर्म घालून वाहनचालकांना लुटणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या
पाच जणांना निपाणी टाऊन पोलिसांनी अटक केली आहे.निपाणी जवळील गवाणी क्रॉस येथे शस्त्रासह पोलिसांनी पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून 55 हजार रोख,दोन दुचाकी,चाकू, नकली पिस्तूल, लाठ्या,तिखट पूड,दोर,बॅटरी आणि महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश,बेल्ट,नकली ओळखपत्र जप्त केले आहे.मोहन पवार(20),हरीश डांगरे (28) दोघेही रा निपाणी,मधुकर निकम(43),संदेश पुजारी(33),अमर बागल(25) हे तिघे रा कागल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यापैकी मोहन पवार हा राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र पोलिसाचा नकली गणवेश घालून वाहने थांबवत होता आणि त्याचे साथीदार वाहनातील व्यक्तीकडून लूट करत होते.निपाणी टाऊन पोलिसात या प्रकरणाची नोंद झाली आहे.