दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेचा सुवर्ण महोत्सव आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.
रविवारी शहरातील ज्योती कॉलेजच्या आवारात आयोजीत केलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेचा सुवर्ण महोत्सव आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करताना माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आर. वाय. पाटील म्हणाले, आमच्या कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी आयएएस, केएएस अश्या मोठ्या हुद्यांवर पोहोचले आहेत. या सर्वांचा आदर्श घेऊन आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल केले पाहिजे.
![Dms](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/03/01.jpg)
आमच्या कॉलेजमध्ये कमी खर्चात शिक्षण उपलब्ध असल्यामुळे दूर गावाहून ग्रामीण भागातील विद्यार्थी या या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण संस्थांमध्ये देखील मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या संस्थांमध्ये मात्र दर्जात्मक शिक्षणावर भर दिला जातो, असे पाटील यांनी अभिमानाने सांगितले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित जेष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. व्ही. पाटील, प्रा. मायप्पा पाटील, सुरेश भातकांडे यांच्यासह मान्यवर निमंत्रित मंडळी, हितचिंतक आणि माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.