कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी(केपीसीसी)अध्यक्षपदी डी के शिवकुमार यांची नियुक्ती केल्याचा आदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केला आहे. तर कार्याध्यक्ष पदी बेळगाव जिल्ह्याचे नेते सतीश जारकीहोळी ईश्वर खंडरे आणि सलीम अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
सी ए एल पी विरोधी पक्ष नेते म्हणून सिद्धरामय्या यांची पुनर नियुक्ती झाली आहे तर नारायण स्वामी यांना विधानपरिषदेचे मुख्य सचेतक तर अजय सिंह यांना विधान सभेचे मुख्य सचेतक बनवण्यात आले आहे.
15 विधानसभा पोट निवडणुकी नंतर माजी केपीसीसी अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी राजीनामा दिला त्या नंतर हे पद रिक्त झाला होत त्या जागी डी के शिवकुमार यांची वर्णी लागली आहे.
शिवकुमार यांना के पी सी सी अध्यक्ष पद देऊन काँग्रेस हाय कमांडने वक्क्लीग तर कार्याध्यक्ष पदी सतीश जारकीहोळी ,ईश्वर खंडरे व सलीम अहमद या तिघांची नियुक्ती करत अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक या समुदायाला नेतृत्व दिलं आहे.