राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद हे आज शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर आले असून त्यांनी राज्याच्या या उत्तर भागातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
कर्नाटका चे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण सुधीर यांनी प्रथमच बेळगावला भेट दिली आहे. आज शुक्रवारी पोलीस महासंचालक प्रवीण सुद त्यांचे विमानतळावर आगमन झाले. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास व शहर पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रवीण सुद यांनी थेट बेळगाव पोलीस मुख्यालयाला भेट दिली. त्याठिकाणी त्यांचे मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. मानवंदना स्वीकारल्यानंतर पोलीस महासंचालकांनी बेळगाव उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
याप्रसंगी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह विजापूर, धारवाड, गदग आणि बागलकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख अनुक्रमे अनुपम अगरवाल, वर्तिका कटियार, एन. यतेश, लोकेश जगलासर तसेच अन्य संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
सूद यांनी के एस आर पी ट्रेनिंग सेंटरला देखील भेट देऊन पाहणी केली.